Pune : महापालिका करणार दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आमदार जगदीश मुळीक यांची माहिती

एमपीसी न्यूज – इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी अभ्यासाचे तंत्र व मंत्र, परीक्षा पद्धती, ताण-तणाव व्यवस्थापन, करिअरची निवड आदी विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यापासून महापालिकेच्या वतीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानुसार व्या‘यानमालांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने येरवडा, चंदननगर, खराडी, वडगावशेरी परिसरातील इयत्ता दहावी आणि बारावीतील एक हजारहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार मुळीक मार्गदर्शन करीत होते.

आमदार मुळीक पुढे म्हणाले, ‘इयत्ता दहावी म्हणजे शालेय जीवनातील शेवटचे वर्ष आणि दहावीची परीक्षा जीवनातील महत्त्वाची म्हणून ओळखली जाते. कुटुंबातील सदस्य आणि समाजाचे दहावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष असते. या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी या व्याख्यानमाला होणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा.’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक बाबुराव कर्णे गुरुजी, संदीप जर्‍हाड, सुनीता गलांडे, शीतल शिंदे, राहुल भंडारे, मुक्ता जगताप, श्‍वेता गलांडे, नाना सांगडे, मतदार संघाचे अध्यक्ष संतोष राजगुरू, प्रभाग समितीचे सदस्य आशा जगताप, सुधीर गलांडे, विशाल साळी, संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.