Pune News : रमजान साजरा करण्यासाठी पालिकेने हे नियम घालून दिले आहेत 

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान महिन्यामध्ये नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीच्या अनुषंगाने एकत्र न येण्याबाबत महापालिकेच्या  वतीने निर्देश देण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज काढले.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मस्जिद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावे. नमाज पठणाकरिता मशिदीत किंवा मोकळ्या जागेत येऊ नये.

 

* सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सोशल डिस्टनसिंग व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून पवित्र रमजान महिना साजरा करावा.

 

* रमजान काळात मुस्लिम बांधव 30दिवस पहाटे पासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पूर्वी तो सोडतात.या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ, अन्न पदार्थ या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी संबंधित प्रभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त व पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी.

 

* रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येतात. परंतु, यावेळी कोरोनाचा वाढता पाहता आपापल्या घरातूनच दुवा पठण करावे.

 

* शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्यात येत २६व्या दिवशी करण्याची प्रथा आहे.या निमित्ताने मुस्लिम नागरिक तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण व नफील नमाज अदा करतात. परंतु,यंदा हे कार्यक्रम घरीच साजरे करावेत.

 

_MPC_DIR_MPU_II

* धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करून बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे.

 

* महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू असल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत व नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

 

* रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक , सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

 

* धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या उद्देशाने जनजागृती करावी.

 

* महाराष्ट्र शासन,गृह विभाग, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

 

* संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.