_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune: पावसाळ्यातील तक्ररीचे निराकरण करण्यासाठी पालिकेने सूरु केला स्वतंत्र कक्ष 

The municipality has set up a separate cell to deal with complaints of rains.

0

एमपीसी न्यूज- पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पडणे,  झाडपाडीच्या घटना, पुराची समस्या, स्ट्रीट लाईटच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. या निर्माण होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी त्या सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवही करण्यासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. हा कक्ष चोवीस तास नागरिकांच्या सेवेत कार्यरत राहणार असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाने सांगितले आहे.

पावसाळ्यामध्ये अनेकवेळा नागरिकांच्या घरामध्ये रस्त्यावरील पाणी शिरणे, रस्त्यावर खड्डे पडणे, यांसारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

_MPC_DIR_MPU_II

अशा वेळी नागरिकांना महापालिका प्रशासनाकडे तक्रार करता यावी, तसेच त्यांच्या तक्रारींवर आवश्यक ती कार्यवाही करता यावी, पावसाच्या प्रमाणाची नोंद घेता यावी, पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरीत होण्यासाठी उपाय योजना करणे, रस्त्यावरील खराड भाग त्वरीत दुरस्त करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, या गोष्टी तातडीने कराता याव्यात, यासाठी महापालिकेतील पथ विभागातील खोली नं. १२९ येथे स्वतंत्र कक्ष कार्यान्वीत ठेवण्यात आला आहे.

हा कक्ष चोवीस तास नागरिकांच्या सेवेत कार्यरत राहणार असून नागरिकांनी आपल्या तक्रारी ०२० २५५०१०८३ या संपर्क क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन पछविभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment