BNR-HDR-TOP-Mobile

Pune : करार संपल्याने शूटिंग रेंजचा महापालिकेने ताबा घ्यावा

0

एमपीसी न्यूज – हडपसर येथील पुणे महापालिकेच्या शूटिंग रेंजचा ताबा करार संपल्यानंतरही संबंधित संस्था पालिकेला देत नाही. या शूटिंग रेंजचा लवकरात लवकर ताबा घ्यावा, अशी मागणी पुणे शूटिंग स्पोर्ट असोसिएशनने केली आहे़. मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी या प्रकरणी विधी विभागाचा अभिप्राय मागविला आहे. तसेच, न्यायलयीन प्रकिया सुरू असल्याचे सांगितले.

असोसिएशनचे सचिव आनंद बोराडे म्हणाले, पुणे महापालिकेने २००६ मध्ये जिल्हा क्रीडा परिषदेसोबत संयुक्त करार केला व जिल्हा क्रीडा परिषदेने ही शूटिंग रेंज पुणे डिस्ट्रिक रायफल असोसिएशनला हस्तांतरित केली़. मात्र, या संस्थेशी केलेला हा करारनामा बेकायदेशीर असून, कराराचा कालावधी पूर्ण होऊनही या शूटिंग रेंजचा ताबा महापालिकेला दिलेला नाही. उलट या संस्थेने मनपा आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याविरूद्ध न्यायालयात दावा दाखल केला आहे.

न्यायालयीन प्रक्रियेत हडपसर येथील शूटिंग रेंज अडकवून सदर संस्थेचे पदाधिकारी पुण्यासह जिल्ह्यातील सर्वच नेमबाजांचे आतोनात नुकसान करीत आहे़.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3