Pune : हृदय विकारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी महापालिका 2,70,00,000 रुपयांचे ट्रेनिंग किट घेणार

स्थायी समितीची मंजुरी; पीएमपीएमएल, एसटी, महापालिका कर्मचारी, व विद्यार्थ्यांना लाभ

एमपीसी न्यूज – हृदय विकारांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. 2 कोटी 70 लाख रुपये किमतीची ट्रेनिंग किट घ्यायला स्थायी समितीने आज मंजुरी दिली, अशी माहिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.

अगदी तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या किटमुळे 90 टक्के उपचार मिळणार असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. हंकारे यांनी सांगितले. या किटचा पुणेकर, पीएमपीएमएल, एसटी कर्मचारी, महापालिका, हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

या किटमध्ये बेसिक मॅनेकीन, ऍडव्हान्स मॅनेकीन आणि टॅब्लेट इत्यादी वस्तुंचा समावेश आहे. ही किट खरेदी करण्यासाठी 2019 – 20 च्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नव्याने बजेट हेड तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आज स्थायी समितीच्या बैठकीत 2 कोटी 69 लाख खर्चाला मान्यता देण्यात आली.

हृदयविकार व रक्तवाहिन्या संबंधीच्या आजार, विजेचा धक्का बसणे, पाण्यात बुडणे, रस्त्यांवरील अपघातांच्या कारणामुळे अचानक हृदयक्रिया बंद पडून मृत्यूचे प्रमाण भारतात जास्त आहे. हृदयक्रिया बंद पडलेल्या 60 टक्के लोकांचा मृत्यू पोहचण्याच्या आधीच होतो. अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास cardio pulmonary – rescucitaion (cpr) प्राथमिक जीवनदायी तंत्र याचे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे शहरातील काही संस्था स्वतः च्या कर्मचारी वर्गातील, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना व सर्वसामान्य लोकांनाही सीपीआर संबंधित प्रशिक्षण देत आहेत. ससून जनरल हॉस्पिटल आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांनीही या प्रशिक्षणात योगदान दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.