_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Nigdi News : प्राधिकरणातील निसर्ग बहरला 

एमपीसी न्यूज – सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट हाहाकार घालत आहे. राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर लोकांची वर्दळ नाही. अधूनमधून वाळवाच्या पाऊसाचा शिडकावा होत असल्याने शहरातील निसर्ग बहरला आहे. प्राधिकरण परिसरात पक्षांच्या संख्येत वाढ झाली असून, फुलांची झाडे लक्ष वेधून घेत आहेत. 

प्राधिकरण परिसरातील गुलमोहराची झाडे अतिशय मनमोहक फुलांनी भरून गेली आहेत. नारिंगी लाल रंगाची फुले लक्ष वेधून घेत आहेत. चाफ्याची झाडे सुद्धा फुलांनी भरून गेलेली आहेत. सकाळच्या वेळेत कोकिळेचा मंजुळ स्वर आनंदाचे वातावरण निर्माण करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पर्यावरण अभ्यासक व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात प्राधिकरण परिसरातील कोकिळेच्या संख्येत तिपटीने वाढ नोंदवली गेली आहे.

समितीच्या विजय मुनोत, संतोष चव्हाण, रुपाली पाटील, अर्चना घाळी, सतीश देशमुख, विजय जगताप या पर्यावरण अभ्यासकांच्या अभ्यासगटाने केलेल्या निरीक्षणात सदरची महत्वपूर्ण बाब समोर आलेली आहे. अनेक दिवसातून जमिनीवरील हिरवळीवर कोकिळा मनसोक्त बागडताना दिसून येत आहेत. लॉकडाऊन काळात ही बाब नक्कीच मनाला आनंद देणारी आहे,’ असे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.