Omicron Variant : नवा व्हेरियंट ओमायक्रोन दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 23 देशांमध्ये पोहोचला

एमपीसी न्यूज : जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचे संकट वाढताना दिसून येत आहे.  अवघ्या आठवडाभरात हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 23 देशांमध्ये पोहोचला आहे. या व्हेरिएंटचा झपाटय़ाने प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी प्रतिबंधात्मक कठोर पावले उचलली आहेत.

 

30 हून अधिक देशांनी आपल्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. ओमायक्रोनविरोधी लढय़ात सर्व देश मोठय़ा ताकदीनिशी उतरले आहेत.ओमायक्रोनचा संसर्ग अत्यंत धोकादायक असल्याचे जाहीर करून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) धोक्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने सर्व देश अॅलर्ट मोडवर आले असून ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय संबंधांवर निर्बंध आणत आहेत.

 

ओमायक्रोन व्हेरिएंट बुधवारपर्यंत ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बोत्सवाना, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, इटली, जपान, नेदरलँड, नायजेरिया, पोर्तुगाल, रीयुनियन, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि ब्रिटन या देशांमध्ये पोहोचला आहे. बुधवारी दक्षिण कोरियातही 5 रुग्ण आढळले. हे नागरिक नायजेरियातून आले आहेत. ओमायक्रोनच्या या वेगवान प्रसारामुळे संपूर्ण जगाची चिंता दिवसेंदिवस आणखी वाढत चालली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.