Pimpri : पिंपरी चौकात एकाच दिवशी पार पडली तब्बल नऊ आंदोलने

एमपीसी  न्यूज – दिल्ली जंतर-मंतर येथे भारतीय संविधान व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या देशविघातक मनूवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध आज पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात आला.

संविधान जाळल्याच्या निषेधार्थ या अपमानास्पद घटनेचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिडेचे शहराध्यक्ष सुधीर पुंडे, जिल्हाकार्याध्यक्ष सतीश काळे, वैभव जाधव, प्रवीण बो-हाडे, रशिद सय्यद, भैय्यासाहेब गजधने, सतीश कदम, सुभाष जाधव, अंतिम जाधव, जयेश दाभाडे, अमोल गजधने, अक्षय गायकवाड, विनोद घोडके, सुभाष साळुंखे, महेश ठोंबरे, सिद्धार्थ शिवसरण,  नितिन पटेकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने संविधान जाळल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विशाल काळभोर,  राष्ट्रवादी  महिलाअध्यक्षा वैशाली काळभोर,  फजल शेख, वीजेएनटी सेल महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, प्रवक्ते फजल शेख, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे, विजय लोखंडे, शकुंतला भाट, आनंदा यादव, विशाल काळभोर, साकी गायकवाड, इम्रान शेख, विश्रांती पाडाळे, मनिषा गटकळ, बाळासाहेब पिल्लेवार, निलेश पुजारी, साऊल शेख, सचिन सकाटे, अभिजीत भालेराव, सैफ खान, सुर्यकांत पात्रे, अमर कांबळे, योगेश आयवळे, गणेश शिंदे, शिवदास चिलवंत, शिवाजी सुरवसे, निर्मला माने, शादाब खान, देवी थोरात, सरोदा तामचीकर, धीरज तामचीकर, अमर गंभिरे, विजय दळवी, विलास महाजन विष्णू सरगर, भालदार गुलामअली, दिनेश पटेल, अरूणा बनसोडे, वर्षा तामचीकर इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रयत विद्यार्थी विचार मंचच्यावतीने संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व आदी कार्यकर्त्यांनी ही  निषेध केला आहे.  तसेच समाजवादी पिंपरी-चिंचवड यांच्यावतीनेही संविधान जाळल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी समाजवादी युवजनसभा राष्ट्रीय सचिव रतन सोनकर, पिंचि शहराध्यक्ष रफिकभाई कुरेशी,उपाध्यक्ष सालार शेख, उपाध्यक्ष कुतबुद्दीन होबळे, भोसरी विधानसभा अध्यक्ष जावेद शहा, उपाध्यक्ष रवि काकडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रवि यादव, युवा आघाडीचे यश यादव, साजीद शेख, मोहसीन शहा, रामरुप यादव ,रवींद्र यादव, मस्तान कुरेशी , महिला आघाडीच्या रुपाली गायकवाड, सपना काकडे, अश्विनी सांडभोर, वहिदा शेख ,सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधानाच्या प्रति  जाळणाऱ्या हिजड्या देशद्रोह्यांचा जाहीर निषेध …..
काल  जातियवादी लोक आरक्षण विरोधी अनुसुचितजाती विरोधी घोषणा देत होते संविधानाच्या प्रति जाळत होते ज्या संविधानाचा गौरव संपुर्ण जग करत असताना ज्या देशाचे हे संविधान आहे त्या देशा मध्ये संविधान जाळल्या जातात, लाच्छनास्पद आहे त्या पेक्षा ही लाच्छनास्पद हे आहे संविधान जाळत असताना कायद्याचे रक्षक  काय करत होते ५६ इंची छातीवाले काय करत होते त्यांनी एकदा जाहीर करुन टाकावे की मनुस्मृती सरकार चालवतात की डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे ज्या मनुस्मृतीने माणसाचे माणुसपणे नाकारले ती मनुस्मृती जाळु दिली जात नाही पोलीसा मार्फत हिसकावल्या जाते जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक केली जाते मग संविधानाच्या प्रती जाळताना कुठे होते सरकार
देशात जे जे ही संविधान विरोधी घडत आहे ते सर्व सरकार पुरस्कृत असुन संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या पैशवाई किडे आणी पेशवाई सरकार जाहिर निषेध करत आहोत संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे युवाप्रदेशाध्यक्ष, बाराबलुतेदार महासंघाचे कार्याध्यक्ष व ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.