India Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे, गेल्या 24 तासांत 24,882 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची वाढ कायम आहे. मागील 24 तासांत देशभरात 24 हजार 882 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 140 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली असून सध्या 2 लाख 02 हजार 022 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत ‌ 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 13 लाख 33 हजार 728 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 09 लाख 73 हजार 260 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यापैकी 19 हजार 957 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 58 लाख 39 हजार 273 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 40 हजार 635 चाचण्या शुक्रवारी (दि.12) रोजी करण्यात आल्या आहेत.

 गेल्या 24 तासांत देशात 140 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 58 हजार 446 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.39 टक्के एवढा आहे‌. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के एवढं झाले आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम अंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटी 82 लाख 18 हजार 457 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 20 लाख 53 हजार 537 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.