Maval Corona Update : मावळ तालुक्यात सक्रिय रूग्णांची संख्या 51 वर

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात बुधवारी  (दि.3) 05 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 51 आहे.

वडगाव नगरपंचायत, लोणावळा नगरपरिषद व तळेगाव नगरपरिषदेच्या  हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही.   सध्या रूग्णालयात 51 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8126 झाली आहे.’तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे येथे 05 रूग्ण सापडले तर शहरी भागात एकही  रुग्ण सापडला नाही.

मावळ तालुक्यातील काल एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. तर आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2463, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1606 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 536 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4605 रुग्ण तर ग्रामीण भागात 3521 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.