India Corona Update : देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली, मागील 242 दिवसांतील नीचांकी 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 451 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 14 हजार 021 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या सध्या देशात 1 लाख 62 हजार 661 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा मागील 242 दिवसांतील नीचांक आहे.  

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 42 लाख 15 हजार 653 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 97 हजार 339 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.19 टक्के एवढा झाला आहे.

 

देशात गेल्या 24 तासांत 585 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 55 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 60.32 कोटी नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 103 कोटी 53 लाख 25 हजार 577 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 55 लाख 89 हजार 124 जणांना गेल्या 24 तासांत लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.