India Corona Update : देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला एक कोटींचा टप्पा 

एमपीसी न्यूज  : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटींच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत 25 हजार 153 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 347 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1 कोटी 4 हजार 599 एवढी झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत 29 हजार 885 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 95 लाख 50 हजार 712 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 8 हजार 751 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट चांगला असून तो 95.40 टक्के एवढा आहे.

 

देशातील कोरोना मृतांची संख्या 1 लाख 45 हजार 136 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात 347 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.45 टक्के एवढा आहे. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 16 कोटी 90 हजार 514 नमूने तपासण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.18) त्यापैकी 11 लाख 71 हजार 868 नमूने तपासण्यात आले आहेत. घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या तुलनेत वाढ झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

देशातील 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 90 टक्क्यांहून अधिक रिकव्हरी रेट आहे. महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटली असून सध्या महाराष्ट्रात 60 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.