India Corona Update : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 90 लाखांच्या पुढे

गेल्या 24 तासांत 45,882 नवे रुग्ण

0

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 90 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 45 हजार 882 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत घट होताना दिसत होती मात्र, दिवाळीनंतर रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 90 लाख 04 हजार 366 एवढी झाली आहे. त्यापैकी 84 लाख 28 हजार 410 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 4 लाख 43 हजार 794 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात मागील 24 तासांत 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

आतापर्यंत देशभरात 1 लाख 32 हजार 162 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.46 टक्के एवढा आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणा-या रुग्णांची संख्या देखील अधिक असून मागील 24 तासांत देशभरात 44 हजार 807 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट 93.60 टक्के एवढा आहे.

 

आयसीएआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 12 कोटी 95 लाख 91 हजार 786 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी गुरुवारी (दि.19) 10 लाख 83 हजार 397 नमूणे तपासण्यात आले आहेत.

 

 

दिवाळीनंतर देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे तसेच, मृतांची संख्या देखील वाढली आहे. देशाचा रिकव्हरी रेट चांगला असला तरी कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III