India Corona Update : देशातील कोरोना बाधितांची संख्या 95 लाखांच्या उंबरठ्यावर 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 36 हजार 604 कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाली असून, 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 95 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 94 लाख 99 हजार 414 एवढी झाली आहे. त्यापैकी 89 लाख 32 हजार 647 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 28 हजार 644 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 43 हजार 062 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के एवढं झाले आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 38 हजार 122 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील मृत्यूचे प्रमाण 1.45 टक्के एवढं आहे.

आयसीएआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 14 कोटी 24 लाख 45 हजार 949 चाचण्या पूर्ण झाल्या असून, त्यापैकी 10 लाख 96 हजार 651 चाचण्या मंगळवारी (दि.1) करण्यात आल्या आहेत.

मागील दहा दिवसांपासून देशात दहा ते अकरा लाखांच्या दरम्यान चाचण्या केल्या जात आहेत. त्यातुलनेत वाढ होणा-या रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणा-या रुग्णांची संख्या देखील वाढली असून देशाचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.