India Corona Update : बाधितांची संख्या 92 लाखांवर, गेल्या 24 तासांत 44,376 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूजगेल्या 24 तासांत देशात 44 हजार 376 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या झालेल्या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 92 लाख 22 हजार 217 एवढी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी देशात सध्या 4 लाख 44 हजार 746 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत

 

मागील 24 तासांत देशभरात 37 हजार 816 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत 86 लाख 42 हजार 771 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 93.71 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 481 रुग्ण दगावले आहेत देशातील कोरोना मृतांची संख्या 1 लाख 34 हजार 699 एवढी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

 

 

_MPC_DIR_MPU_II

 

आयसीएआरच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 13 कोटी 48 लाख 41 हजार 307 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील 24 तासांत 11 लाख 59 हजार 032 नमूणे तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना चाचणीच्या समान दरासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटी-पीसीआर चाचणीचा कमाल दर सगळ्या देशात सारखा म्हणजे 400 रुपये असण्याची गरज आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे व न्या. ए.एस.बोपण्णा व न्या. व्ही रामसुब्रमणियन यांनी आरोग्य मंत्रालयाला नोटीस जारी केली असून अजय अग्रवाल यांनी दाखल केलेल्या लोकहिताच्या याचिकेवर आता दोन आठवडय़ांनी सुनावणी होणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 100 देशांचे राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. भेटीचा हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 27) आणि शनिवारी (दि. 28) या दोन टप्प्यात होणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेली कोरोना प्रतिबंधक लस ही 90 टक्के परिणामकारक असल्याचा दावा अ‍ॅस्ट्राझेनका कंपनीने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर 100 देशातील राजदूत सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीचा आढावा घेणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1