India Corona Update : देशात सलग पाचव्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक   

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असून बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक आहे. देशात आज (शनिवारी, दि‌.15) सलग पाचव्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मागील 24 तासांत देशात 3 लाख 53 हजार 299 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 26 हजार 098 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 04 लाख 32 हजार 898 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सध्या 36 लाख 73 हजार 802 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 3 हजार 890 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 66 हजार 207 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.09 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 83.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात आजवर 31 कोटी 30 लाख 17 हजार 193 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 16 लाख 93 हजार 093 चाचण्या शुक्रवारी (दि.14) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 18 कोटी 04 लाख 57 हजार 579 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. दरम्यान, भारतातील कोरोना परिस्थिती चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रॉस घेब्रुयासिस यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.