India Corona Update : सोमवारपेक्षा 50 हजाराने रुग्ण संख्या घटली, 24 तासांत 614 मृत्यू 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 55 हजार 874 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारपेक्षा 50 हजाराने रुग्ण संख्या घटली आहे. 24 तासांत 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 15.52 टक्के एवढा झाला आहे. 

1. देशात सध्या 22.36 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. चोवीस तासांत 2 लाख 67 हजार 753 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

3. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 71.88 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 16.49 लाख चाचण्या पार पडल्या.

4. देशात सलग पाच दिवस तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.

5. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

6. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 162.92 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.