India Corona Update : गेल्या 24 तासांत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या कमी

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून देशात बरे होणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 40 हजार 134 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 36 हजार 946 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 3 कोटी 08 लाख 57 हजार 467 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 16 लाख 95 हजार 958 एवढी झाली आहे. देशात सध्या 4 लाख 13 हजार 718 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 24 हजार 773 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 422 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 97.36 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात आजवर 46 कोटी 96 लाख 45 हजार 494 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 28 हजार 984 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 47 कोटी 22 लाख 23 हजार 649 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 17 लाख 06 हजार 598 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.