Pimpri News : पिंपरीत सीएचे ऑफिस फोडले; रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी मध्ये चार्टर्ड अकाऊंटंटच्या ऑफिसच्या मागील खिडकीच्या ग्रीलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 54 हजारांची रोकड चोरून नेली. तसेच त्याच इमारतीत असलेल्या फायनान्सच्या ऑफिसमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी महालक्ष्मी हाईट्स, पिंपरी येथे उघडकीस आली.

किशोर माधवदास गुजर (वय 61, रा. निगडी प्राधिकरण)  यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे महालक्ष्मी हाईट्स येथे पहिल्या मजल्यावर किशोर अँड असोसिएट्स या नावाने चार्टर्ड अकाऊंटचे ऑफिस आहे. सोमवारी रात्री सात वाजता फिर्यादी यांनी त्यांचे ऑफिस बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी ऑफिसच्या मागील खिडकीचे ग्रीलचे कुलूप तोडून ऑफिस मध्ये प्रवेश केला. ऑफिस मधील लाकडी टेबलाच्या ड्रॉवरचे लॉक तोडून 54 हजार 400 रुपये रक्कम, मोबाईल फोन चोरून नेला.

त्यानंतर चोरट्यांनी महालक्ष्मी हाईट्स  इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेल्या आवास फायनान्सियर्स लिमिटेड या ऑफिसच्या मागच्या खडकीचे ग्रील तोडून खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. ऑफिसमधील टेबल ड्रॉवरचे लॉक तोडून, ऑफिसमधील सामान अस्ताव्यस्त करून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.