Chinchwad : घरासमोर बसलेल्या वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – घरासमोर बसलेल्या वृद्ध महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी तीन वाजताच्या सुमारास श्रीधर नगर चिंचवड येथे घडली.

प्रभा अनिल कापसे (वय 61, रा. श्रीधरनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कापसे त्यांच्या सोसायटीच्या समोर बसल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी कापसे यांच्या गळ्यातील 40 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.