Pune : मत विभाजन टाळून युतीचा पराभव हेच उद्दिष्ट – खासदार राजू शेट्टी

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीत जागांसाठी जास्त आग्रह न धरता, मत विभाजन टाळून युतीचा पराभव करणे, हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. तसेच मनसे आणि वंचित बहुजन विकास आघाडी ने काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. शेट्टी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्यावर शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जेथून निवडणूक लढतील त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढविणार असल्याचे शेट्टी यांनी पुन्हा जाहीर केले. आघाडीने घटक पक्षांना 38 जागा सोडविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, आमची मागणी 55 ते 60 जागांची आहे. यामध्ये जागांवर न अडता, भाजप-शिवसेना युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करणे हे महत्वाचे उद्दिष्ट असल्याचे शेट्टी यांनी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like