Pimpri : अवयवदानातून मरणानंतरही जिवंत राहता येतं

अवयवदान जनजागृतीसाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा पुढाकार

एमपीसी न्यूज – अवयवदान ही काळाची गरज आहे. लाखो रुग्णांना योग्य अवयव नसल्यामुळे आयुष्यभर अपंगत्वात जगावे लागते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे मरणानंतर जिवंत राहण्यासाठी अवयवदान करणे आवश्यक आहे. हा धागा पकडून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीच्या परतीच्या प्रवासात अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यात आली. या प्रवासामध्ये 10 जणांनी अवयवदान केले.

अवयवदान जनजागृती मोहिमेत अध्यक्ष रो प्रदिप वाल्हेकर, रो गणेश बोरा, रो सुभाष वाल्हेकर, रो अॅड. सोमनाथ हरपुडे, रो सचिन काळभोर, रो संदीप वाल्हेकर, रो सुनील कवडे, रो स्वाती सुनील वाल्हेकर, रो वसंत ढवळे, रो शेखर चिंचवडे, रो विनायक घोरपडे आदी उपस्थित होते. बिर्ला हॉस्पिटल आणि वात्सल्य दिव्यांग मुलांचे पुनर्वसन केंद्र संस्थेच्या सदस्यांनी यासाठी सहकार्य केले. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या वतीने उद्या (गुरुवारी) अवयवदान मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. अवयवदानाबद्दल आजही अनेक गैरसमज असल्याने हे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे कित्येक गरजूवंत अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रदीप वाल्हेकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीने अवयवदानाचा निर्णय घेतला, तर त्यामुळे भविष्यात सात जणांचे प्राण वाचणार आहेत. सात जणांना या जगात आनंदाने राहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मृत्यूनंतर देखील जिवंत राहण्यासाठी अवयवदान करणे महत्वाचे आहे. शहरातील सर्व रोटरी क्लब आणि इतर संस्था मिळून गुरुवारी (दि. 9) अवयवदान जनजागृतीचा विक्रम करणार आहेत. त्याची नोंद लिंक बुक ऑफ रोकोर्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

अवयवदान मोहिमेत सहभागी होण्यासाठी हे करा- अवयवदान करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने देखील ते करता येणार आहे. त्यासाठी www.giftlife.co.in या संकेतस्थळावर सुरुवातीला आपले नाव नोंदवावे लागेल. त्यानंतर अवयवदानाचा फॉर्म भरून अवयवदान मोहिमेत सहभागी झाल्याचे नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु ही नोंदणी 9 ऑगस्ट (गुरुवार) या एकाच दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेतच करणं आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.