Pune : मूळ बालगंधर्व रंगमंदिराला धक्का न लावता अद्ययावत केले जाईल – मुक्ता टिळक

एमपीसी न्यूज – बालगंधर्व रंगमंदिराचे मूळ मंदिर पडण्याच्या वल्गनेला अर्थ नाही. ते अद्ययावत करताना कलेला, कलाकाराला धक्का लावणार नाही. जुने मंदिर न पाडता ते सुधारण्याचा विचार करीत आहे. त्याबाबत काही प्रस्ताव असून समिती स्थापन केली आहे. समाजाच्या भावना, आधुनिक दृष्टीकोन सांभाळून ते अद्ययावत केले जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. 

बालगंधर्व रंगमंदिराचा 52 वा वर्धापन दिनाचे उद्घाटन झाले. महापौर मुक्ता टिळक, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी उपस्थित होते. यावेळी त्या बोलत होत्या.

केंद्रे म्हणाले,  “बालगंधर्व रंगमंदिराचा रंगमंच नवीन बांधून नवीन काही करणार असाल तर क्षमा करा. ब्रिटनला जाणा-या माणसाची यात्रा जोपर्यंत शेक्सपियरच्या थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर तो उद्धवस्त करून बांधणार का? ताजमहलावर पाणी पडले म्हणून ते पाडणार का? एखादे थिएटर कसे असावे याचा उत्तम नमुना बालगंधर्वला आहे. देशात त्याला तोड नाही. कोणत्याही सादरीकरणासाठी असे उत्तम उदाहरण सापडणार नाही. ते आहे त्या परिस्थितीत डागडुजी करून आधुनिक पद्धतीने जपलं पाहिजे.” अशा स्पष्ट भाषेत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी प्रशासनाला ठणकावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.