Vadgaon Maval : सातबारा उता-यावरील मूळ मालकच बदलले; शासकीय अधिका-यांचा अजब कारभार!

दुरुस्ती करण्याची रहिवाशांची मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ – येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मीनगर काॅलनीमधील सर्व बिगरशेती प्लाॅट सर्वे नं 141/2/2ड/2 जी/17 , प्लॉट नं 1, 2, 4, 5, 8, 10, 11, 12, 13, व ओपन प्लाॅट, अशा अनेक नागरिकांची 7/12 उता-यावरील नावे गायब झालेली दिसून आलेली आहे. उता-यावरील मूळ मालकांऐवजी दुस-यांचीच नावे त्यावर आलेली आहेत. या प्लाॅटच्या 7/12 वरील चुक दुरुस्त करून द्यावीत अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस, माजी उपसरपंच विशाल वहिले यांच्यासह कान्हु सावले, पुखराज बाफना, मनोरमा कावडे, अशोक चव्हाण, लिला वहिले, अॅड अजित वहिले, पद्माकर प्रधान, राजेंद्र वहिले आदींनी गाव कामगार तलाठ्याकडे तक्रार केली आहे.

वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मीनगर काॅलनीमधील सर्व बिगरशेती प्लाॅट सर्वे नं 141/2/2ड/2 जी/17 , प्लॉट नं 1, 2, 4, 5, 8, 10, 11, 12, 13, व ओपन प्लाॅट, रस्ते यांचे सातबारे उतारे ऑनलाइन पाहिले असता अनेक उता-यांवर हा सातबारा बंद आहे. असा शेरा मारल्याचे दिसून आले. काही 7/12 उता-यावर मूळ मालकांऐवजी दुसरीच नावे आली आहेत. हे सर्व 7/12 उतारे दुरुस्त करून द्यावेत, अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे.

7/12 उता-यांचे संगणकीकरण करताना अनेक चुका व त्रुटी राहिल्या असून त्याचा परिणाम या रहिवाशांना भोगावा लागला आहे. नागरिकांनी तक्रारी केल्याशिवाय या चुका दुरुस्त केल्या जात नाहीत. चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात तसेच तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. शासकीय अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे या सर्व नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या अधिकारीवर्गाप्रती प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.