Chakan Double Murder : मालकाच्या मुलीला कामगारांनी पळवून नेले; दोन्ही कामगारांचे मृतदेह मालकाच्या हॉटेलमध्ये सापडले

सहाजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – हॉटेल आणि वीटभट्टीचा व्यवसाय असणाऱ्या एका व्यवसायिकाच्या विटभट्टीवर काम करणाऱ्या एका कामगाराने मालकाच्या मुलीला पळवून नेले. त्यास दुसऱ्या कामगाराने साथ दिली. त्यानंतर मालकाने मुलगी आणि तिला पळवून नेणाऱ्या दोघांना शोधून हॉटेलमध्ये बेदम मारहाण केली. यात दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. संबधित मुलीवर देखील खुनी हल्ला करण्यात आला असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे.  हा प्रकार खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे समोर आला आहे.

हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक असलेल्या मुलीच्या वडिलांसह सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बाळू सिताराम गावडे (वय 26), राहुल दत्तात्रय गावडे (वय 28, दोघे रा. आसखेड खुर्द, ता. खेड, जि. पुणे) अशी मृतावस्थेत आढळलेल्या दोन कामगारांची नावे आहेत.

या प्रकरणी करंजविहीरे येथील हॉटेल  मालक  यांच्यासह  सहा जणांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खेड तालुक्यातील करंजविहिरे येथे संशयित आरोपीचे हॉटेल आहे. हॉटेलसमोर त्याची वीटभट्टी आहे. मयत बाळू गावडे आणि राहुल गावडे त्या वीटभट्टीवर काम करत होते. बाळू गावडे याने मालकाच्या 21 वर्षीय मुलीला पळवून नेले. त्यासाठी राहुल गावडे याने मदत केली.

वीटभट्टी मालक आणि साथीदारांनी बाळू, राहुल आणि मुलगी या तिघांना शोधले. त्यांना हॉटेलमध्ये आणून लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. संबधित मुलीवर देखील खुनी हल्ला करण्यात आला असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

या दुहेरी खून प्रकरणात पोलिसांनी मुलीचे वडील आणि अन्य पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.