Bhosari : सोसायटीत पार्क केलेली कार पेटवली

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली कार अज्ञातांनी पेटवून दिली. ही घटना सेक्टर नंबर सहा मोशी येथे गुरुवारी पहाटे घडली.

मोहम्मद अरफान हुसेन (वय 29, रा. सेक्टर नंबर सहा, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर नंबर सहा मधील साई वर्टेक्स हाऊसिंग सोसायटीमध्ये फिर्यादी मोहम्मद राहतात. बुधवारी (दि. 31) रात्री साडेअकरा वाजता त्यांनी त्यांची स्विफ्ट कार (एम एच 14 / बी आर 1099) सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. रात्री अज्ञातांनी त्यांची कार पेटवून दिली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी (दि. 1) पहाटे दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.