Pimpri: कोजागिरी पोर्णिमेसाठी महापालिकेची उद्याने राहणार रात्री एकवाजेपर्यंत खुली

एमपीसी न्यूज – कोजागिरी पोर्णिमेचा नागरिकांना आनंद घेता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्याने उद्या (मंगळवारी) रात्री एक वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पावसाळा संपल्यानंतर कोजागिरी ही पहिली पोर्णिमा येते. आकाशात काळ्या कुट्ट ढगाळ वातावरणाचे साम्राज्य संपल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला येणारी चंद्राची किरणे मनाला सुखावतात. त्यामुळेच या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दस-यानंतर कोजागिरी साजरी करतात. उद्या (मंगळवारी) कोजागिरी पोर्णिमा आहे.

शहरातील नागरिकांना कोजागिरी पोर्णिमा साजरी करण्यासाठी दरवर्षी महापालिकेची उद्याने रात्री उशिरापर्यंत खुली ठेवली जातात. महापालिकेची शहरात 105 उद्याने आहेत. नागरिकांना मंगळवारी कोजागिरी पोर्णिमेचा आनंद घेता यावा यासाठी महापालिकेची उद्याने रात्री एकवाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.