HSC Result : निकालाचा टक्का सलग दुसऱ्या वर्षी घसरला; एक लाख 23 हजार 903 विद्यार्थी नापास

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC Result) वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एकंदरीत राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी निकालाची टक्केवारी घसरली आहे.
Manobodh by Priya Shende Part 101 : मनोबोध भाग 101- जया नावडे नाम त्या येम जाची
यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी सर्व शाखांमधून 14 लाख 28 हजार 194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एक लाख 23 हजार 903 विद्यार्थी नापास झाले आहेत.
सन 2021 मध्ये राज्याचा निकाल 99.63 टक्के लागला होता. त्यानंतर निकालाची टक्केवारी घसरून सन 2022 मध्ये 94.22 टक्के निकाल लागला. यावर्षी पुन्हा निकालाची टक्केवारी घसरली आहे. सन 2023 या वर्षाचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी निकालाची टक्केवारी घसरली आहे.
यावर्षी 7 लाख 67 हजार 386 मुलांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील 6 लाख 84 हजार 118 पास झाले. 83 हजार 268 मुले नापास झाली आहेत. तसेच 6 लाख 48 हजार 985 मुलींनी परीक्षा दिली असून 6 लाख 8 हजार 350 मुली पास झाल्या आहेत. 40 हजार 635 मुली यावर्षी नापास झाल्या आहेत. मुलांचा निकाल 89.14 टक्के तर मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 4.59 टक्के मुलींचा निकाल जास्त लागला आहे.