Bhosari : पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवासी महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील २८ हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 6 फेब्रुवारी 2020 रोजी कासारवाडी येथे उघडकीस आली.

रंजना अशाोक चौकडे (वय 63, रा. सिंहगड रोड, नांदेड सिटी, पुणे) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 18) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार ते पाच अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंजना बसने पुणे- कासारवाडी असा प्रवास करीत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील 28 हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली. कासारवाडी येथे बसमधून उतरल्यानंतर रंजना यांना बांगडी चोरीला गेल्याचे समजले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.