Nigdi : रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील टोणगांवकर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी गोँधळ घालत तोडफोड केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.12) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला.

आक्रम सिद्दीक शेख (वय 38, रा.दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तालीब (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) वय अदांजे 25 ते 30 आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  टोणगांवकर रुग्णालयात फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचे रुग्ण अब्दुल गनी चौधरी हे अॅडमीट होते. आरोपी हे त्यांचे नातेवाईक असून त्यांनी हातात दांडके घेत रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयाच्या प्रवेशदाराची काच फोडत 30 हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like