Pimpri : रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची माहिती रुग्णांना मिळावी

आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्र्याकडे मागणी

एमपीसी न्य़ूज – रुग्णालयात येणा-या गरीब-गरजू रुग्णांना एसएनसीयु, एनआयसीयु, आयसीयु या अतिदक्षता विभागाची योग्य माहिती पारदर्शकरित्या उपलब्ध व्हावी अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, शहरातील धर्मादाय व शासकीय रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचाराकरिता येत असतात. शहरातील शासकीय रुग्णालये ससून, जिल्हा रुग्णालयस वाय.सी.एम. हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान अनेकदा रुग्णांना व नवजात बालकांना तातडीच्या सेवेकरीता आयसीयु, एसएनसीयु, एनआयसीयु अशा विभागाची गरज असते. शहरातील धर्मादाय व शासकीय रुग्णालय अंतर्गत संगनमत झाल्यास एसएनसीयु, एनआयसीयु, आयसीयु विभागाची माहिती ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होऊन संबंधित रुग्णालयामार्फत वेळेतच माहिती मिळाल्यास गरजू गरीब रुग्णांची गैरसोय होणार नाही. तसेच शहरातील धर्मादाय व शासकीय रुग्णालयांमधील एसएनसीयु, एनआयसीयु, आयसीयु विभागातील बेडची उपलब्धतता ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात संबंधित रुग्णालयाच्या संकेत स्थळावर अपडेट झाल्यास याची नागरिकांना मदत होईल.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांच्याशी बोलणे झाले असता ते म्हणाले की, शहरातील धर्मादाय व शासकीय रुग्णालयामध्येवरील सर्व उपाययोजना केल्या जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.