Pimpri: रुग्णवाढीचा उच्चांक! आज 212  नवीन रुग्णांची भर; 124 जणांना डिस्चार्ज

The peak of morbidity! Today added 212 new patients; Discharged 124 people

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 201 आणि महापालिका  हद्दीबाहेरील  11 अशा 212 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  आजपर्यंतची सर्वांत मोठी ही रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजपर्यंत शहरातील 3230 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील लिंबोरेवस्ती दापोडी, लोंढेचाळ पिंपरीगाव, सिद्धार्थनगर दापोडी, पवारनगर सांगवी, इंदिरानगर चिंचवड, पवारवस्ती दापोडी, घरकुल चिखली, ममतास्वीट कॉर्नर दिघी, काळभोरनगर चिंचवड, अजंठानगर, महात्मा फुलेनगर भोसरी, आकाशनगर दिघी, पाटीलनगर चिखली, कदमचाळ खराळवाडी, विश्वशांती कॉलनी पिंपळेसौदागर, मोहनगर चिंचवड, विठ्ठलनगर दापोडी, जोतीबानगर काळेवाडी, सहयोगनगर निगडी, संभाजीनगर, बजरंगनगर खराळवाडी, किवळे, निगडी प्राधिकरण, गुळवेवस्ती भोसरी, चिंचवडेनगर, दळवीचाळ नेहरुनगर, शनिमंदिर वाय.सी.एम., महिंद्रा पिंपरी, समर्थनगर सांगवी, यमुनानगर निगडी, गांधीनगर पिंपरी, विठ्ठलनगर भोसरी, दत्तनगर चिंचवड, श्रध्दा गार्डन काळेवाडी, संततुकारामनगर पिंपरी, वडमुखवाडी, भारतमातानगर दिघी, आदित्यबिर्ला हॉस्पीटल, मिलिंदनगर पिंपरी, वैभवनगर पिंपरी,सेंट अर्सला स्कुल आकुर्डी, हॉलमार्क रावेत, रहाटणी,च-होली, भोसरी, शाहूनगर चिंचवड, त्रिवेनीनगर तळवडे,सेक्टर २८ निगडी, चौधरीपार्क दिघी, दळवीनगर चिंचवड,एल.आय.सी.ऑफिस आकुर्डी, गणेशनगर बोपखेल, शिवतेजनगर चिखली, केशवनगर चिखली, विनोदेनगर वाकड, बौध्दनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, मधुबन सोसायटी पिंपरी, आकुर्डी, शितल रेसिडन्सी पिंपरी, वाकडकर वस्ती वाकड,प्रेमलोक चिंचवड, जवळकर बिल्डींग कासारवाडी,भोईआळी चिंचवड, लांडेवाडी भोसरी, साईकुंज कासारवाडी,तनिष्क च-होली, शास्त्रीचौक भोसरी, आनंदतरंग च-होली,वैशालीनग पिंपरी, आदर्शनगर दिघी, बापदेवनगर देहूरोड, नढेनगर काळेवाडी, आदर्शनगर काळेवाडी, कृष्णानगर, ताम्हाणेवस्ती चिखली,भिमशक्तीनगर,बौध्दनगर निगडी, मोरेवस्ती चिखली,राजीव गांधी वसाहत नेहरुनगर, तुपेचाळ दापोडी, नाटेकरचाळ नेहरुनगर, गवळीमाथा, वाल्हेकरवाडी परिसरातील 201 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 118 पुरुष आणि 83 महिलांचा समावेश आहे. तर,  शितळानगर देहूरोड, पवनानगर मावळ, बीड, इंदापूर, सिंहगडरोड, चाकण, नांदेड, बोपोडी, मामुर्डी येथील 5 पुरुष आणि 6 महिला अशा 11 जणांनाही  कोरोनाची बाधा झाली.  त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, केशवनगर चिंचवड, प्रभातनगर पिंपळेगुरव, अजंठानगर, भाटनगर, हनुमान मंदिर पिंपरी,बौध्दनगर पिंपरी, आंबेडकर कॉलनी पिंपरी, समर्थनगर सांगवी, दत्तनगर वाकड, आनंदनगर चिंचवड, संत गजानन महाराज नगर दिघी, वडमुखवाडी, शास्त्रीचौक भोसरी, मोरयापार्क पिंपळेगुरव, सी.एम.ई.गेट दापोडी, इंदिरानगर चिंचवड, मुंजोबा वसाहत चिंचवड, ट्रफिक पोलीस ऑफिस भोसरी, डांगेचौक थेरगांव, महेंद्रा नेहरुनगर,श्रीनगर थेरगांव, सुखवाणी आकुर्डी, कोकणेनगर काळेवाडी, नक्षत्रम चिंचवड, शुभश्री आकुर्डी, रमाबाईनगर पिंपरी, जयभीमनगर दापोडी, नानेकरचाळ पिंपरी, तापकिरमळा चौक काळेवाडी, मोरेवस्ती चिखली, मोहननगर, विठ्ठलनगर नेहरुनगर, सुदर्शननगर पिंपळेगुरव, सिध्दार्थनगर दापोडी,साईचौक सांगवी,आदर्शनगर काळेवाडी,संततुकारामनगर भोसरी,यमुनानगर निगडी,सिध्दिविनायक कॉलनी रहाटणी,जगताप डेअरी पिंपळेनिलख,कैलासनगर थेरगांव,सुर्यदर्शन सोसायटी इंद्रायणीनगर,लक्ष्मीनगर पिंपळेगुरव,पवारवस्ती दापोडी,बिजलीनगर, निराधारनगर पिंपरी, मोरवाडी, तुळजाईकॉलनी थेरगांव,विठ्ठलमंदिर बोपखेल, नाशिकफाटा कासारवाडी,प्रेरणास्कुल थेरगांव,माळवाडी देहूगांव,रास्तापेठ, शिरुर येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 124 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 3230 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1986 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 47 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 30 अशा 77 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1193  सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 789
# पॉझिटीव्ह रुग्ण – 212
#निगेटीव्ह रुग्ण – 343
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1485
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1962
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1232
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 3230
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1193
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  77
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1986
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 28786
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 92770

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.