Nigdi : पादचारी तरुणाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – पायी चालत जात असलेल्या तरुणाला पैशांची मागणी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटले. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री साडेदहाच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

मोनु छोटूलाल तेजी (वय 25, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिक्षा चालक स्वानंद उर्फ चिक्या नागेश खरात (वय 22, रा. अजंठानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोनू बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथून रस्त्याने पायी चालत जात होते. ग्लोबल वाईन्स समोर आले असता आरोपी स्वानंद रिक्षातून आला. त्याने मोनू यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यासाठी मोनू यांनी नकार दिला. त्यामुळे चिढलेल्या आरोपीने मोनू यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फोन व 2 हजार रुपये जबरदस्ती हिसकावून घेतले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.