Bhosari : पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटयांनी हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी सातच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली.

सुनीता विकास पवार (वय 33, रा. गंधर्व व्हिला हाऊसिंग सोसायटी, इंदायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता पवार त्यांच्या मुलीला नेहमीप्रमाणे शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. त्यावेळी रस्त्यात दबा धरून बसलेल्या चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे गंठण हिसकावले. घटनेनंतर चोर तिरुपती चौकाच्या दिशेने पळून गेले. यावरून सुनीता यांनी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.