Nigdi : पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील चोरटयांनी हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री सव्वाअकराच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

हणमंत परगौडा मुत्तकनवर (वय 58, रा. प्रतापगड सोसा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हणमंत रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी त्यांच्या हातातील 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.