Hinjawadi : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असणा-या तरुणाचा अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी फेज 2 येथे घडली.

पारुल राजनारायण पाल (वय 24, रा. हिंजवडी) या तरुणाने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पारुल कामावरून घरी जात होते. ते हिंजवडी फेज 2 येथील पंजाब कृषी हॉटेल शेजारी असलेल्या गल्लीतून रस्त्याने पायी जात होते. अचानक मागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला पकडले आणि हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.