Wakad : प्लास्टिक वापरल्याप्रकरणी वाकडमध्ये चार दुकानदारांकडून दंड

एमपीसी  न्यूज –   महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घाततेली असतानाही वाकड येथे काही व्यापा-यांकडून या नियमांचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून येथील चार दुकानदारांकडून पालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. आज दिवसभरात वीस हजार पाचशे रुपयांचा दंड दुकानदारांकडून वसूल केला. 

_MPC_DIR_MPU_II

प्लास्टिक वापरावर शासनाने नुकतीच बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत.  आज दि. २५ मे रोजी वॉर्ड क्रमांक २४ मधील वाकडरोड येथे २० दुकानांची तपासणी केली. त्यापैकी चार दुकानदारांकडे ५.५. किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. कच-याबाबत एका व्यक्तीवर कारवाई करुन दोनशे रुपयांचा दंड  तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे दोन व्यक्तीकडून तीनशे रुपये दंड वसूल करण्यात आला, असे एकूण मिळून २०,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही सर्व कारवाई सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरिक्षक राजीव बेद, आरोग्य निरिक्षक एस. बी. चन्नाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.