MHT-CET 2020 : एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

The petition seeking postponement of the MHT CET exam was rejected by the Supreme Court.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.  सर्वोच्च न्यायालयानं हि याचिका फेटाळून लावली असून याचिकाकर्त्यांना फटकारत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयानं जेईई व नीट परीक्षेसंदर्भात दिलेल्या निकालाचा हवाला देत याचिकाकर्त्यांना फटकारलं.

आम्ही नीट व जेईई परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. मग आता आम्ही एका राज्यात परीक्षा घेण्याचं कसं कसं थांबवू शकतो? न्यायालयानं दिलेले आदेश तुम्ही तपासून बघायला हवे होते, अशा शब्दात न्यायालयानं फटकारलं आहे.

 

कोरोनामुळे देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे.

त्यामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसह जेईई व नीट परीक्षेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं जेईई व नीट परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.

मात्र, यापरिक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य टाकत असल्याचा आरोप होत असून या परिक्षा घेण्यासाठी राजकीय स्तरातून विरोध होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.