Punavale News : लग्न समारंभाचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरची दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – लग्न समारंभाचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका फोटोग्राफरची दुचाकी हॉटेलच्या पार्किंगमधून चोरीला गेली. ही घटना सोमवारी (दि. 15) भर दिवसा पुनावळे येथे घडली.

किरण राजेंद्र बाबर (वय 23, रा. रहाटणी फाटा) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबर हे फोटोग्राफीच्या ऑनलाईन ऑर्डर घेतात. सोमवारी त्यांना पुनावळे येथे होणा-या एका विवाहाची ऑर्डर मिळाली. त्यासाठी ते पुनावळे येथे गेले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांची 45 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / जे जे 5615) पार्क केली. सकाळी दहा ते दुपारी चार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दुपारी चार वाजता ऑर्डर संपवून बाबर हॉटेलच्या बाहेर आले असता दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.