Chinchwad : चौकशीसाठी आणलेल्या तरुणाचा पोलीस चौकीत राडा

एमपीसी न्यूज –  चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या तरुणाने आरडाओरडा करत तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन राडा घातला. हा प्रकार बुधवारी (दि. 26) रात्री साडेबाराच्या सुमारास मोहननगर पोलीस चौकीत घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

योगेश दामोदर पवार (वय 29, रा. रामनगर, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई बाबासाहेब साहेबराव पाखरे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार याला बुधवारी रात्री चौकशीसाठी मोहननगर पोलीस चौकीत आणले होते. पोलीस चौकीत बोलावल्याच्या रागातून त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अरे तुरेची भाषा वापरात अंगावर धावून गेला. तसेच शिवीगाळ करीत खुर्चीला लाथ मारली व कपाटावरील टीव्ही खाली पाडला. चौकीत धिंगाणा घालत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.