Police Constable : ऐकावे ते नवलच! चक्क ‘या’ कारणासाठी पोलीस हवालदाराने वरिष्ठांकडे मागितली सुट्टी

एमपीसी न्यूज – कोण, कधी, केव्हा आणि कशासाठी सुट्टी मागेल त्याचा काही नेम नाही. पोलिस दलात सुट्टी पाहिजे असल्यास रीतसर अर्ज करावा लागतो. पुणे पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराचा (Police Constable) सुट्टी साठी केलेला अर्ज सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या पोलीस हवालदाराने चक्क आपल्या सहकार्यांसाठी मासे घेऊन यायचे आहे, यासाठी सुट्टी देण्यात यावी असा अर्ज केला आहे. पोलीस हवालदाराने केलेल्या या अर्जाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे पोलीस दलातील खडक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा पोलीस हवालदार (Police Constable) काम करतो. काही दिवसांपूर्वी हवालदाराने सुट्टीसाठी अर्ज केला मात्र अर्जातील मजकूराने अर्ज चांगलाच व्हायरल झाला.

Sex Racket : ‘गे’ म्हणून बदनामीची धमकी देत तरुणांना लुबाडणाऱ्या चौघांना अटक

दरम्यान, हवालदाराने अर्जात लिहिले होते, “मला माझ्या सहकार्यासाठी चिलापी व रव मासे घेऊन यायचे आहे, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आपल्या गावी जायचे आहे. त्यासाठी मला दोन दिवसाची सुट्टी देण्यात यावी” असा अर्ज पोलीस हवालदाराने आपल्या वरिष्ठांकडे केला, जो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.