Pimpri News : मास्क सक्तीच्या दंडात्मक कारवाईतील 50  टक्के महसुल पोलिसांना मिळणार

एमपीसी न्यूज – कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्यास पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाबरोबरच पिंपरी – चिंचवड पोलीसांकडूनही मास्क न वापरणा-या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीसांकडून मास्क सक्तीबाबत दंडात्मक कारवाई करून जमा झालेल्या 100 टक्के महसुलापैकी 50 टक्के महसुल पिंपरी महापालिकेस आणि 50 टक्के महसुल पिंपरी – चिंचवड पोलीस खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या. त्याचबरोबर अनेक नियमही बनवले. त्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, न थुंकणे असे नियम लागू केले. नियमांचे उल्लंघन केल्यास महापालिका प्रशासनाबरोबरच पिंपरी – चिंचवड पोलीसही संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करू लागले.

कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 15 पोलीस स्टेशन, तीन पोलीस चौकी आणि 10 वाहतूक विभागामार्फत कोरोना संकटकाळात विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मास्क न वापरणा-या बेशिस्त नागरिकांकडून कोट्यावधीचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी – चिंचवड पोलीस विभागामार्फत मास्क सक्तीबाबत दंडात्मक कारवाई करून जमा झालेल्या 100  टक्के महसुलापैकी 50 टक्के महसुल पिंपरी – चिंचवड महापालिकेस आणि 50 टक्के महसुल पिंपरी – चिंचवड पोलीस खात्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महापालिका सभेने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.