Pimpri News : पॉझिटीव्हीटी दर 19.22 टक्के तर  मृत्यूदर 1.51 टक्के

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर 19.22 टक्के आहे. तर,  मृत्यूदर 1.51 टक्के आहे. याबाबतची माहिती महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी दिली.

महापालिका दहा कोवीड केअर सेंटर चालवित असून तेथील खाटांची संख्या 2 हजार 318 आहे. तर खासगी 97 रुग्णालयांमध्ये 3 हजार 229 खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 3 हजार 819 खाटा असून ऑक्सिजन खाटांची संख्या 1 हजार 24 असून आयसीयू विदाऊट व्हेंटीलेटरची संख्या 169 आहे. आयसीयु विथ व्हेंटीलेटरची संख्या 144 आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने नियंत्रण अधिका-यांच्या विभागवार नियुक्त्या केल्या आहेत. त्यांना कामाचे वाटपही केले आहे. नागरिकांनी कोरोनाविषयक अडीअडचणींबाबत अधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोरेडी यांनी केले.

महापालिका रुग्णालयात ‘रेमडिसीवीर’ इंजेक्शनचा पुरेसा साठा आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांनाच आपण  ‘रेमडिसीवीर’ देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रतिशंभर नमुने तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या म्हणजेच पॉझिटीव्हीटी दर होय.  (उदा- 100 नमुन्यातील 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास 20 टक्के पॉझिटीव्हीटी हा दर असतो.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.