Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद त्वरित भरावे

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद हे रिक्त असून हे पद त्वरित भरावे अशी मागणी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनकडे पत्राद्वारे केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली भिवंडी येथे उपआयुक्त पदावर झाली. त्यांनी 29 जानेवारी रोजी आपला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज सोडला आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी पदभार स्वीकारला आहे.

सध्या नगरपरिषदेस पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक प्रशासकीय निर्णय घेणे अवघड झाले असून प्रशासकीय विकास कामे देखील मंदावली आहेत. त्यामुळे नवनियुक्त मुख्याधिकारी त्वरित नियुक्त करावा. असे पत्र जिल्हाधिकारी यांना नगराध्यक्षा यांनी दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like