Pimpri news: उपमहापौरपद पिंपरी मतदारसंघातच राहणार; केशव घोळवे यांचे नाव निश्चित?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदासाठी मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचे नाव निश्चित झाल्याचे अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. दरम्यान, पुन्हा पिंपरी मतदारसंघातच पद जाणार आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांना हा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबर 2020 रोजी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. त्या जागी त्यांच्याच प्रभागातील घोळवे यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

उपमहापौरपदासाठी उद्या (सोमवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. भाजपमधील गोपीनाथ मुंडे गटाने उपमहापौरपद मिळविण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती.

_MPC_DIR_MPU_II

पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमहापौरपदासाठी घोळवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

केशव घोळवे यांची कामगार नेते अशी ओळख आहे. संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभागातून ते 2017 च्या  निवडणुकीत भाजपकडून निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडून आले आहेत.

मातब्बर समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण बहिरवाडे यांचा त्यांनी पराभव केला आहे.  अ क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1