Pune : लॉकडाऊन किती दिवस मान्य करायचे हे जनतेने ठरवावे : ॲड. प्रकाश आंबेडकर

ॲड. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरला लॉकडाउनविरोधात आंदोलन करण्यात आले. : The public should decide how many days to accept the lockdown: Adv. Prakash Ambedkar

एमपीसी न्यूज – मार्च 2019 ते मे दरम्यान अंदाजे 1,23,512 मृत्यू झाले, तर 2020 मध्ये याच काळात अंदाजे 74, 413  मृत्यू झाले. महामारी आली असेल तर हा मृत्यूदर अर्धा कसा काय झाला ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ट्विट करून उपस्थित केला. सामान्य माणसाला रस्त्यावर आणणारं लॉकडाउन किती दिवस मान्य करायचं हे जनतेने ठरवावं, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज, बुधवारी ‘डफडे बजाव’ आंदोलन सुरू आहे. ॲड. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरला लॉकडाउनविरोधात आंदोलन करण्यात आले.

सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते, सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाउन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सरकारच्याच अहवालानुसार 80 टक्के भारतीयांमध्ये करोनाच्या विरोधातील अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. 15  टक्के लोकांमध्ये त्या तयार होत आहेत. उरलेल्या 5  टक्के लोकांमध्ये करोनाच्या अँटिबॉडी तयार झालेल्या नाहीत. या लोकांना सरकारने शोधून काढून त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत.

मात्र, सरकार त्यांना शोधण्याऐवजी 95  टक्के लोकांना लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठिस धरण्याचे काम करत आहे.

सरकारच्या या मनमानी धोरणामुळे छोट्याछोट्या व्यावसायिकांचे व समाज घटकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत ॲड. आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.