Pune News : 1 जानेवारीला पुणे-नगर महामार्ग राहणार बंद

एमपीसी न्यूज : कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सर्वत्र खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहे. अशात गर्दी टाळण्यासाठी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहे.

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लोकांनी यंदाच्या वर्षी घरातूनच अभिवादन करावे, असं आवाहन आधीच प्रशासनाने केले आहे. त्यानंतर आता 1 जानेवारी रोजी पुणे – नगर महामार्ग बंद राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसंच, या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, असं जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

एल्गार परिषदेला परवानगी नाही

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

लोकशासन संवादतर्फे ही सांस्कृतिक परिषद घेण्यात येणार होती. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता आयोजक काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.