Pimpri News : रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीवर 34 लाखांचा खर्च होणार

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता निर्माण झाली आहे. 100 एमजीच्या पाच हजार कुपी (व्हायल्स) तातडीने  नाशिक येथील गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स यांच्याकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत.  जीएसटीसह 666.40 रुपयांना एक कुपी खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी येणा-या 33 लाख 32 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. महापालिकेची विविध रुग्णालये तसेच कोरोना रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी तातडीने रेमडेसिवीर 100 एमजी या इंजेक्शनची आवश्यकता आहे.

रुग्णांवरील या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी 16 मार्च तर वायसीएमएचचे अधिष्ठता यांनी 22 मार्च 2021 रोजी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यानुसार तातडीने महापालिकेच्या पुरवठाधारकांकडून आपत्कालीन परिस्थितीत पत्र देवून दरपत्रके मागविण्यात आली.

त्यापैकी तुलनात्मक तक्त्यानुसार लघुत्तम पुरवठाधारक गेटवेल डिस्ट्रीब्युटर्स यांचा रक्कम रुपये 595 सीएसटीसह 666.40 प्रति कुपी (व्हायल्स) असा दर प्राप्त झाला आहे. त्यानुसार त्यांच्याकडून थेटपद्धतीने पाच हजार कुपी थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 33 लाख 32 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.