Pune Corona Update: कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्याचे प्रमाण जास्त; 1185 नागरिकांची कोरोनावर मात

The rate of recovery is higher than that of corona patients; 1185 persons overcame the disease, 28 deaths.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आता कोरोनाच्या अजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी 1185 नागरिकांची या आजारावर मात केली.

कोरोनाच्या 6 हजार 151 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये  818 नवे रुग्ण आढळले. तर, 28 जणांचा मृत्यू झाला. 626 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 376 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 54 हजार 255 रुग्ण झाले आहेत. 35 हजार 123 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 312 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

17 हजार 820  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बालाजीनगरमधील 69 वर्षीय पुरुषाचा भाकरे हॉस्पिटलमध्ये, वडगांवशेरीतील 53 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, धनकवडीतील 57 वर्षीय पुरुषाचा, संगमवाडीतील 68 वर्षीय महिलेचा, जनता वसाहतमधील 66 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 64 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, वडगावमधील 78 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 73 वर्षीय पुरुषाचा नायडु हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धानोरीतील 62 वर्षीय महिलेचा AICTS हॉस्पिटलमध्ये, संतोष नगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, बुधवार पेठेतील 63 वर्षीय महिलेचा, घोरपडी पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा, खराडीतील 61 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 61 वर्षीय महिलेचा, कात्रजमधील 54 वर्षीय महिलेचा, औंधमधील 54 वर्षीय महिलेचा, आंबेगाव बुद्रुकमधील 78 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

सिंहगड रोडवरील 85 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 78 वर्षीय पुरुषाचा, धानोरीतील 88 वर्षीय पुरुषाचा, संगमवाडीतील 70 वर्षीय महिलेचा कस्तुरबा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 54 वर्षीय महिलेचा आणि 48 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 73 वर्षीय पुरुषाचा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

बाणेरमधील 97 वर्षीय पुरुषाचा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 38 वर्षीय पुरुषाचा मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, घोरपडी गावातील 48 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 68 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.