Pune News : हॉर्स रायडर श्रिया पुरंदरेच्या आत्महत्येचे खरे कारण आले समोर

एमपीसी न्यूज – पुणे ः नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या श्रिया पुरंदरे (वय 17) हिने पुण्याच्या नांदेड सिटीतील इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार घडला होता. तिने आत्महत्या का केली याचे कारण आता समोर आले आहे. हवेली पोलिसांनी श्रियाच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला असून त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

श्रियाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन आठवड्यांपासून श्रिया ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे तणावात होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातो. हवेली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

श्रिया उत्तम हॉर्स रायडर होती. लहानपणापासून ती हॉर्स रायडिंगचे धडे गिरवत होती. तिच्या नावावर रायडिंगमधले अनेक पुरस्कार आहेत. मात्र, तिने अचानक आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदेड सिटी परिसरात श्रिया कुटुंबीयांसह राहत होती. रविवारी सकाळी नऊ वाजता तिने राहत्या इमारतीतील 11 व्या मजल्यावरून उडी मारली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.